सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (11:09 IST)

धक्कादायक !काबूलहून उड्डाण केलेल्या अमेरिकन सैन्याच्या विमानाच्या चाकात मृतदेह सापडले,तपास सुरु

काबुल विमानतळावर अमेरिकन विमानाच्या चाकांवर बसून अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या लोकांच्या जमावाच्या व्हिडिओच्या एक दिवसानंतर,अमेरिकन हवाई दलाने सांगितले की लँडिंगनंतर लष्करी विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेह सापडले आहेत.यूएस हवाई दलाचे सी -17 विमान सोमवारी काबूलहून उड्डाण केल्यानंतर कतरमध्ये दाखल झाले होते, जिथे विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेह सापडले.
 
अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा झाल्यानंतर देश सोडून जाणाऱ्यांची काबूल विमानतळावर स्पर्धा आहे. यापूर्वी आणखी एक हृदयद्रावक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, चाकांवर बसलेले लोक अमेरिकन विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच खाली पडताना दिसले. 
 
काबूल विमानतळावरील गोंधळ अगदी सॅटेलाईटच्या चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. येथे, एकीकडे, इतर देशांना त्यांच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढायचे आहे, तर दुसरीकडे, तालिबानच्या काळ्या इतिहासाची भीती बाळगून, आता हजारो अफगाणींना ही देश सोडून पळून जायचे आहे. 
 
अमेरिकेच्या हवाई दलाने म्हटले आहे की ते काबुलवरून उड्डाण घेतलेल्या सी -17 विमानाच्या चाकावर सापडलेल्या मानवी मृतदेहाचे अवशेष तपासत आहे.हवाई दलाने एक निवेदन जारी केले आहे, रविवारी अमेरिकन हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर 3 विमान आवश्यक उपकरणे देण्यासाठी काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळीच शेकडो अफगाणांनी विमानातून आवश्यक उपकरणे काढण्यापूर्वीच विमानात प्रवेश केला. बिघडलेली परिस्थिती पाहून, क्रूने शक्य तितक्या लवकर विमान परत घेण्याचा निर्णय घेतला.