गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जानेवारी 2022 (15:23 IST)

जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचा होणार लिलाव, गिनीज बुक मध्ये नोंद आहे

ब्लॅक डायमंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कट हिऱ्याचा लवकरच लिलाव होणार आहे. हा हिरा नुकताच दुबईत लोकांसमोर ठेवण्यात आला. या प्रसिद्ध हिर्‍याची कीर्ती अशी आहे की एकेकाळी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठा कट हिरा म्हणून त्याचे नाव नोंदवले होते. हा हिरा पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.
 या हिऱ्याचे नाव द एनिग्मा आहे आणि हा 555.55 कॅरेटचा काळा हिरा आहे. माहितीनुसार, हा हिरा सध्या दुबईत आहे, तिथून तो लॉस एंजेलिसला नेण्यात येणार आहे. यानंतर या हिऱ्याचा लिलाव या वर्षी फेब्रुवारीमध्ये लंडनमध्ये होणार आहे. सोथेबी या लिलाव कंपनीने सोमवारी हा हिरा दुबईत ठेवला आहे.
 
वीस वर्षांहून अधिक काळ हिरा कधीही सार्वजनिकरित्या प्रदर्शित किंवा विकला गेला नाही. तो बराच काळ संग्रहात ठेवण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लिलाव कंपनीच्या अधिकारीच्या म्हणण्यानुसार, 2.6 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा उल्का किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तेव्हा हा दुर्मिळ काळा हिरा तयार झाला होता. 
लिलावात या हिऱ्याची किंमत 5 दशलक्ष ब्रिटिश पौंड म्हणजेच सुमारे 50.7 कोटी रुपये मिळू शकते, असेही सांगण्यात येत आहे. कंपनी यासाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट घेण्याचाही विचार करत आहे. हा अप्रतिम हिरा खरेदी करण्यासाठी सुमारे 160 बिटकॉइन्सची आवश्यकता असेल. सध्या त्याच्या किंमतीबद्दल पूर्णपणे काहीही सांगणे घाईचे आहे.
 
सध्या तो हिरा दुबईत ठेवण्यात आला असून लवकरच तो लिलावासाठी तयार होईल.  हा काळा हिरा आहे, काळ्या हिऱ्याला कार्बनडो असेही म्हणतात. असे हिरे फक्त ब्राझील आणि मध्य आफ्रिकेत आढळतात. 2006 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याला जगातील सर्वात मोठा कट हिरा म्हणून नाव दिले.