गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 जुलै 2024 (10:30 IST)

कमला हॅरिस यांना अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं अखेर जाहीर केलं. त्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहन अनेकांकडून गेल्या काही आठवड्यांमध्ये करण्यात आलं होतं.
 
बायडन हे आता त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करतील. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यासही त्यांनी समर्थन जाहीर केलंय.
 
डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन महिन्याभरावर आलेलं असताना बायडन यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला आता एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय जो बायडन यांनी जाहीर केला आहे.