बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2019
Written By
Last Updated : गुरूवार, 28 मार्च 2019 (16:39 IST)

KKR vs KXIP: पंजाबच्या पराभवानंतर प्रिती झिंटाच्या ट्विटने फॅन्सचे मन जिंकले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 12व्या सीझनमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब टीमला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 28 धावांनी पराभव मिळाली. या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या को-ओनर प्रिती झिंटाच्या ट्विटने फॅन्सचे मन जिंकले आहे. सामन्यानंतर प्रिती झिंटाने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर शाहरुख खानचे अभिनंदन केले.

या सामन्या दरम्यान प्रीटी झिंटा स्टेडियममध्ये दिसली नाही. सामना संपल्यानंतर तिने ट्विटरवर लिहिले, 'शाहरुख खानला अभिनंदन, केकेआरने चांगला खेळ दाखवला. हा एक मोठा स्कोर होता आणि आम्ही ध्येय साध्य करण्यासाठी आमच्या सर्वोत्तम प्रयत्न केला, पण हा आमचा दिवस नव्हता. पण उद्या नवीन दिवस असेल, आमचा पुढचा सामना मोहालीच्या होम ग्राउंडवर आहे.' 

 
कोलकाता नाईट रायडर्सने होम ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करताना 218 धावा बनवल्या. उत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ 20 ओवरमध्ये चार विकेटांवर फक्त 190 धावा बनवू शकली.