गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

राजस्थान-हैद्राबादसाठी ‘करो या मरो’

WD
हैद्राबाद सनरायझर्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी आयपीएलच्या सहाव्या सत्रात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले. सनरायझर्सव राजस्थान या दोन्ही संघासाठी सामन्यापैकी प्रत्येकी १० विजय मिळवत २० गुणांसह एकीमीनेटर राऊंडसाठी पात्र ठरले. राजस्थान रॉयल्सची निव्वळ धावगती चांगली असल्याने तिस-या क्रमांकावर आले. त्यांची धावगती +०.३२२ असून सनरायझर्सची ०.००३ अशी आहे. उभयतातील फिरोजशहा कोटलावर होणारा सामना बादफेरी सारखाच उपान्त्यपूर्व सामन्यासारखा आहे. पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे, याचाच अर्थ हा सामना त्यांना डू ऑर डाय, करो या मरो असा आहे, उपान्त्य संघातील विजयासाठी २४ मे रोजी ईडन गार्डन कोटलावर उपान्त्य सामना खेळावा लागेल. हा सामना मंगळवारी हटणा-या संघाला बुधवारी जिंकणा-या संघाशी खेळावयाचा अघाहे. आजचा जिंकणारा संघ मात्र थेट अंतिम सामन्यात पात्र ठरला आहे. तो सामना येत्या रविवारी २६ रोजी ईडन गार्डनवर होईल.गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. २००८ ला राजस्थान रॉयल्सच्या आयपीएलच्या पहिल्या सत्राचा

विजेता होते. २००९ चा दुस-या सत्राचा विजेता होता हैद्राबाद डेक्कन चार्जर्स. परंतु यावर्षी यासंघाची मालकी बदलली आहे. त्यामुळे त्याचे नाव सनरायझर्स हैद्राबाद असे झाले आहे. २०१० च्या तिस-या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज चॅम्पियन्स

झाली. २०११ च्या चौथ्या सत्रात त्यांनी विजेतेपद राखले. पण २०१२ च्या पाचव्या सत्रात चेन्नई सुपरकिंग्जला विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करता आली नाही. त्यांना चिदंबरम्वर कोलकोता नाईट रायडर्सने हरवत विजेतेपद पटकावले.

२०१३ चे सहावे सत्र संघात संपत आले आहे. शेवटच्या आठवड्यात प्लेऑफ सामने सुरु झाले आहेत. या वेळचा विजेता असेल तो चेन्नई, राजस्थान, हैद्राबाद की मुंबई? मुंबई इंडियन्सने आजपर्यंत एकदा आयपीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही.पण प्लेऑफमधील उरलेली चारही संघात कधी ना कधी विजेतेपद मिळवले आहे.

फिरोजशहा कोटलाचे मैदान म्हणजे गोलंदाजांना मदत करणार असा, लौकिक आहे.याच मैदानावर अनिल कुंबळेने पाकिस्तानचे एका डावात दहाच्या दहा फलंदाज तंबूत पाठवले होते. या मैदानाची स्पेनरलेग आणि पॉइंटवरील सीमारेषा ऑन व ऑफ पेक्षा जवळ आहे. फिरकी गोलंदाज या मैदानावर वर्चस्व गाजवतील. हैद्राबादच्या संघातील भारतीय संघात निवड झालेला अमित मिश्रा की राजस्थान रॉयल्समधील केव्हान कूपर.या सामन्यात हरणा-या चौथ्या क्रमांकावरील संघाला पावणे चार कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झालेला आहे. म्हणजे या सामन्यात पराभूत होणा-याला ३.७५ कोटी रुपये पदरात पडणार आहेत. पण विजेत्याला मात्र शुक्रवारी हरण्यास पावणेचार कोटीच मिळतील. पण जिंकणारा संघ रविवारी दहा कोटीसाठी खेळू शकेल.