सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (16:48 IST)

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

SRH vs KKR
आज क्वालिफायर-1 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्स (KKR), जे गुणतालिकेत अव्वल आहेत, त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळणार असल्या, तरी केकेआर आणि हैदराबाद हा सामना जिंकून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील.

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करून अनेक विक्रम केले आहेत. हेडने एक शतक आणि चार अर्धशतकांसह 533 धावा केल्या आहेत.नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांचे फॉर्ममध्ये असणे केकेआरसाठीही खूप महत्त्वाचे आहे.
 
आयपीएल 2024 चा क्वालिफायर 1 सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.
 
या वर्षी आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचणारा KKR हा पहिला संघ होता तर शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव करून सनरायझर्स दुसऱ्या स्थानावर होता.आज दोन्ही संघांना चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचे आहे. हवामान अंदाजानुसार, 21 मे रोजी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाही.

आयपीएल प्लेऑफमध्ये केकेआरने एकूण 13 सामने खेळले असून 8 जिंकले आणि 5 हरले आहे. तर सनरायझर्स ने एकूण 11 सामने जिंकले असून 5 सामने जिंकले आणि 6 सामने हरले आहे.  
 
दोन्ही संघाचे प्लेइंग 11 
 
कोलकाता नाइट रायडर्स: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे. 
 
सनरायझर्स हैदराबाद : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. 

Edited by - Priya Dixit