मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 1 डिसेंबर 2018 (08:52 IST)

आता व्हॉटसअपच्या स्टेटस फीचरमध्ये जाहिरात

व्हॉटसअपमध्ये असणाऱ्या प्रायव्हसीमुळे कंपनीकडून स्टेटस फीचरमध्ये जाहिरात देण्यास सुरवात करणार आहे. अशा पद्धतीचे फिचर यापूर्वीच इन्स्टाग्राममध्ये आहे. व्हॉटसअपच्या स्टेटस फिचरमध्ये जाहिरातींची सुरवात अँड्रॉईड आणि iOS वर एकाचवेळी सुरु होणार आहे. आपल्याला स्टेटस फिचरमध्ये जाहिरात पाहावीच लागणार आहे. बंद करण्याचा कोणताही पर्याय आपल्याजवळ असणार नाही. 
 
व्हॉटसअपचे दोन्ही संस्थापक यूझर्स प्रायव्हसीमध्ये अत्यंत सतर्क होतेच पण त्याचबरोबर त्यांचा व्हॉटसअपमध्ये जाहिरात देण्यास कडाडून विरोध होता. ब्रियेन आणि जेन या दोन्ही व्हॉटसअप संस्थापकांनी मालकी हक्क फेसबुकला विकले असल्याने ते आता व्हॉटसअपमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे व्हॉटसअपची पूर्ण मालकी आहे. फेसबुकने व्हॉटसअपमध्ये जाहिराती देण्याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्या कोणत्या प्रकारे दिल्या जातील हे स्पष्ट केले नव्हते.