रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (11:39 IST)

नोकरीच्या शोधात असलेले 3 कोटी भारतीयांचे तपशील डार्कनेटवर

सुमारे 3 कोटी भारतीय तरुणांचे वैयक्तिक तपशील विक्रीसाठी डार्कनेटवर उपलब्ध असल्याचे कळून आले आहे. नोकरीच्या शोधात या भारतीयांची माहिती या प्रकारे लीक होत असल्यामुळे सायबर यंत्रण काळजीत आहे. 
 
अमेरिकी कंपनी सायबीलने ही गोष्ट लक्षात आणून दिली असून यात देशातील प्रमुख शहरांमधील दोन कोटी 90 लाख तरुणांचे नाव, पत्ता, ईमेल आयडी, फोन नंबर व इतर तपशील डार्कनेटवर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. 
 
हॅकर्सनी इतका तपशील कोठून मिळवला याबाबत मात्र सायबीलचे तज्ञ निष्कर्षांवर आलेले नाहीत. मात्र नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या दोन नामांकित वेबसाइट्सची नावे अहवालात आहे.

राज्याच्या सायबर विभागानेही या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या डेटाचा चुकीचा वापर होऊ शकतो म्हणून सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.