रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2019 (15:28 IST)

आता Google Maps वर आपल्याला मोफत मिळेल ही मोठी सुविधा

सार्वजनिक वाहतुकबद्दल लोकांमध्ये एक समूजत अशी असते की या नेहमीच उशीर करतात. Google Maps ने लोकांच्या या समस्येचा उपाय काढला आहे. देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये Google Maps वर आता बसमुळे लागणार्‍या प्रवासाच्या वेळेची माहिती देखील उपलब्ध होईल. इतकेच नव्हे तर, लोकांना भारतीय रेल्वेची अचूक स्थितीविषयी माहिती देखील Google Maps वर मिळेल. 
 
कंपनीने एका वक्तव्यात म्हटलं आहे की यासह लोकांना ऑटो रिक्षा आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्याय आणि सुझाव देखील Google Maps वर उपलब्ध होतील. यामुळे वापरकर्त्यांना सार्वजनिक वाहतूक प्रणालीने आपल्या प्रवास योजनांचे नियोजन करण्यात मदत होईल. Google Maps प्रंबधकांप्रमाणे Google मध्ये Maps सह असे फीचर्स जोडण्यावर लक्ष केंद्रित केले जातं आहे ज्यामुळे प्रवाश्यांना अधिक प्रासंगिक, अचूक आणि विश्वासू अनुभव मिळेल.
 
यामुळे दिल्ली, बंगलोर, मुंबई, हैदराबाद, पुणे, लखनऊ, चेन्नई, म्हैसूर, कोयंबटूर आणि सूरतमध्ये आता वापरकर्त्यांना बस प्रवासाच्या वेळेस लाइव्ह माहिती मिळेल.