रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2019 (14:08 IST)

World Cup 2019: Jio ची मोठी धमाल, मोफत बघा सर्व सामने लाइव्ह, जाणून घ्या ऑफर्स

आपण देखील क्रिकेटचे दीवाने असाल तर पण आपण आपल्या फोनवर World Cup 2019 पाहू शकत नसल्याची खंत वाटत असेल तर रिलायंस जिओने आपल्यासाठी एक मोठी भेट आणली आहे. रिलायंस जिओने क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या विशेष प्रसंगी सिक्सर पॅक सादर केलं आहे. जिओच्या या ऑफरचा फायदा लाखो ग्राहकांना मिळेल. चला जिओच्या या ऑफर बद्दल पूर्णपणे जाणून घ्या...
 
Jio ने या ऑफरसाठी Hotstar सह भागीदारी केली आहे आणि या भागेदारी अंतर्गत जिओच्या सर्व ग्राहकांना मोफतमध्ये वर्ल्ड कप 2019 सर्व सामने आपल्या फोनवर लाइव्ह पाहता येतील. 
 
विशेष गोष्ट म्हणजे जिओचा हा ऑफर पूर्णपणे मोफत आहे. अशामध्ये जर आपण एक जिओ वापरकर्ते असाल तर आपण आपल्या फोनमध्ये सहजपणे लाइव्ह सामने पाहु शकता. आपण जिओ टीव्ही अॅप किंवा हॉटस्टार अॅपवर फ्रीमध्ये मॅच बघू शकता, तथापि आपल्या फोनमध्ये जिओ सिम कार्ड असणे आवश्यक आहे.
 
त्याचवेळी कंपनीने Cricket World Cup 2019 बद्दल एक विशेष पॅक देखील सादर केला आहे, त्याची किंमत 251 रुपये आहे. या पॅकचा लाभ म्हणजे की जरी आपल्या फोनचा सध्याचा पॅक संपला देखील असेल तरी आपण लाइव्ह मॅच बघू शकता. या पॅकची वैधता 51 दिवसांची आहे आणि या प्लॅनमध्ये एकूण 102 जीबी डेटा मिळेल.