बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (08:47 IST)

नवे फीचर, Your Time on Facebook

फेसबुकने युझर्सकरता किती वेळ सोशल साइट्सवर घालवता हे ट्रॅक करणार एक नवं फिचर तयार केलं आहे. कंपनीने आता हे नवं फिचर सुरू केलं आहे. या फिचरवर युझर्सला अंदाज येईल की त्यांनी सोशल मीडिया साइट्स म्हणजे फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यावर किती वेळ घालवला आहे. Your Time on Facebook नावाचं हे फिचर असून युझर्ससाठी हे सुरू केलं आहे.
 
जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रावर वेळ घालवत असाल तर तुम्ही या फेसबुक साइटवर लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्ही सेटिंग आणि प्रायवेसी ऑप्शनवर टॅप करा. यावर तुम्हाला योर टाइम ऑन फेसबुक नावाने ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही किती वेळ घालवला आहे.