आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, फेसबुकने दिलं स्पष्टीकरण
फेसबुक हे पारदर्शी, खुलं आणि निःपक्षपाती आहे, फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून आम्ही
आमची धोरणं कशी लागू करतो यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. तसंच काही पक्ष फेसबुकवर नियंत्रण ठेवत असल्याचाही आरोप झाला.
मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. फेसबुक इंडियाचे वाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजित मोहन यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची धोरणं कशी लागू करतो आहोत त्यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे. हे आरोप आम्ही गांभीर्याने घेतले आहेत. आमच्यावर झालेल्या या आरोपांचा आम्ही निषेध करतो. यापूर्वीही आणि यापुढेही वादग्रस्त पोस्ट हटवण्याचं काम सुरुच राहणार आहे असंही अजित मोहन यांनी म्हटलं आहे.