गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. लता मंगेशकर
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (17:27 IST)

लता मंगेशकर यांचे पार्थिवाची अंत्ययात्रेला सुरुवात ; पंतप्रधान मुंबईत दाखल

भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण लागली होती नंतर त्यांना न्यूमोनिया झाला. शेवटी त्यांचे अवयव निकामी झाल्यामुळे आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 
त्यांचे पार्थिव अंत्ययात्रेसाठी त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथून शिवाजी पार्क येथे रवाना झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे 6 :30 च्या दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असून ते मुंबईत दाखल झाले आहे. 
केंद्र सरकारने देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. आज शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमातात अंत्य संस्कार होणार आहेत.