मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 मार्च 2019 (10:29 IST)

अमित शहा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज गांधीनगरमधून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. अमित शाहांचा अर्ज दाखल करतेवेळी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
 
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरू आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यानुसार आज दुपारपर्यंत अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान अमित शाह यांचा अर्ज भरतेवेळी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. तसेच आज गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
 
असा असेल उद्धव ठाकरे यांचा गुजरात दौरा –
 
सकाळी 9.30 वाजता उद्धव यांची गांधीनगर येथे सभा होईल. ही सभा झाल्यानंतर दुपारी एक वाजता अमित शाह यांचा अर्ज भरतेवेळी उपस्थित राहतील आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता  उद्धव ठाकरे मुंबईला परततील.