रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (17:00 IST)

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपमध्ये सामील

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्यांना भाजपची सदस्यता दिलवली. या दरम्यान अरुण जेटली पत्रकार परिषदेत म्हणाले की मोदींच्या दृष्टिकोनामुळे गौतम गंभीर अत्यंत प्रभावित झाले आहे. देशासाठी काहीतरी करू इच्छित आहे म्हणूनच त्यांना भाजपचा पाठिंबा मिळाला आहे. गौतम गंभीरचा क्रिकेटमध्ये देखील मोठा वाटा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांचा मोठा सहभाग होता. तिकिटांच्या प्रश्नावर जेटली म्हणाले की याबाबत निवडणूक समिती निर्णय घेईल.
 
या दरम्यान जेटली यांनी नाव न घेता नवजोत सिंह सिद्धूवर हल्ला केला. ते म्हणाले की काही क्रिकेटपटू पाकिस्तानचे समर्थक बनले आहे, पण गंभीर तसे नाही. याशिवाय अर्थमंत्री जेटली यांनी काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदावर देखील काउंटर अटॅक केला. जे लोक देशाला समजत नाही, तेच असे वक्तव्य देतात. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवर ते म्हणाले की आता आम्ही केवळ संरक्षण नव्हे तर प्रहार देखील करतो.