शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 30 मार्च 2019 (16:39 IST)

राधाकृष्ण विखे पाटील संग्राम जगताप यांचा उमेदवारी भरायला जाणार नाही

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडीचे काम करणार नाही असे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नाही असे स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.  काँग्रेसची मुंबईत महत्वाची  बैठक होत असून, बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेर होते.  त्यावेळी त्यांनी या बद्दल माहिती दिली आहे. 
 
त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत लोकसभेत भाजप पक्षात प्रवेश केल्याने  राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मोठा गहन पेच निर्माण झाला. ते  काँग्रेसचे स्टार प्रचारक असल्याने  निवडणूक प्रचार संदर्भात बोलताना म्हणाले, ” मी पक्षाचा पूर्ण राज्यात प्रचार करणार आहे, मी सर्व आघाडीच्या सभांना देखील जाणार आहे, मात्र मी  राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला मी जाणार नाही. मी काँग्रेसच्या बैठकीला आलो आहे.” त्यामुळे आघातील त्यांचा राग दिसून येतो आहे. नगरची जागा मुलासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस ने सोडावी अशी मागणी त्यांनी केली होती मात्र शरद पवार यांनी ते ऐकले नाही.