1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

खर्चिक उमेदवारांवर सिटिझन मीटची नजर

निवडणूक आयोगाने उमेदवारास खर्चासाठी मर्यादा घालून दिली असली तरीही ती धाब्यावर बसवून वारेमाप खर्च होत असतो. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. पण अशा उमेदवारांचा पर्दाफाश करण्यासाठी एक स्वयंसेवी संघटना पुढे सरसावली आहे.

सिटीझन मीट नावाच्या या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्यक्षात जास्त खर्च करूनही तो कागदोपत्री कमी दाखविणार्‍या उमेदवाराविरोधात आयोगाच्या दरबारी धाव घेण्याचे ठरविले आहे. अशा उमेदवारांनी केलेल्या जाहिरातींचे कटिंग गोळा करून त्याशिवाय इतरही पुरावे एकत्रित करून ते आयोगापुढे मांडण्याचे जाहिर केले आहे. मॅगेसेसे पुरस्कार विजेते संदिप पांडे व उत्तर प्रदेश चे माजी पोलिस महासंचालक ईश्वर दत्त द्विवेदी हे या संस्थेशी निगडित आहेत.

जाहिरात व जाहिरातीसारखीच छापेलली बातमी यासाठी केलेला खर्च आयोगापुढे मांडलाच जात नाही. त्यामुळे अशी हेराफेरी पकडून ती आयोगाच्या निदर्शनास आणली जाणार असल्याचे या द्वयीने सांगितले.