शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जुलै 2020 (11:01 IST)

वाचा, अमिताभ यांना आनंद महिंद्रा काय म्हणतात

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या बातमीने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्व चाहत्यांनी तुम्ही लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना देखील केली. दरम्यान, आता उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

उद्योजक आनंद महिंद्रा यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले आहे की, ‘आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. खरं तर तुमच्या शरीरातच लस आहे. ज्याचे कोड नेम ‘बिग बीं’ आहे. जी तुमच्या शरीरात पहिल्या पासूनच आहे. त्यामुळे तुम्ही सहजरीत्या या कोरोनावर मात करु शकता’. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.