जगातील सर्वात महाग बिर्याणी Royal Gold Biryani
बिर्याणी म्हटलं बिर्याणी प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटणे साहजिक आहे. अनेकांना नॉन व्हेज बिर्याणी तर काही लोकांना व्हेज बिर्याणी आवडते परंतू सोन्याची बिर्याणी बद्दल कधी ऐकले आहते का? पण गोल्ड बिर्याणी हा काय प्रकार आहे आणि दुबई याचा स्वाद घेता येऊ शकतो तसेच ही जगातील सर्वात महाग बिर्याणी असल्याचं सांगितलं जातं आहे.
DIFC मधील Bombay Borough रेस्टॉरंटमध्ये ही रॉयल गोल्ड बिर्याणी खायला मिळेल. रेस्टॉरंटला एक वर्ष झाल्यानंतर हा मेन्यू जोडण्यात आला. ही बिर्याणी 23 कॅरेट सोन्यानं सजवली जाते. यामध्ये कश्मीरी मटण, कबाब, पुरानी दिल्ली मटण चॉप्स, राजपूत चिकन कबाब, मुगलई कोफ्ते, मलाई चिकनही आहे. केसर, सोनं याने गार्निशिंग आणि सोबत सॉस, करी आणि रायता सर्व्ह केलं जातं.
हे वाचून आश्चर्य वाटत असेल पण मनात प्रश्न असेल की याची नेमकी किंमत किती आहे. तर बिर्याणीच्या एक प्लेटची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे. आपल्याला किंमत जास्त वाटत असेल तर काळजी करण्यासारखे नाही कारण ही प्लेट सहा जणांमध्ये शेअर करता येईल.
अवघ्या 45 मिनिटांत ही बिर्याणी तयार होऊन आपण आपल्या जीभेचे लाड पुरवू शकता.