गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

गुगल असिस्टंटच्या मदतीने करा तिकीट खरेदी

गुगल असिस्टंटद्वारे आता चित्रपटांचं तिकीट खरेदी करता येणार आहे. यासाठी गुगलने अमेरिकेची कंपनी फंडांगोसोबत भागीदारी केली आहे. युजर्स आता व्हॉइस कमांडचा वापर करुन गुगल असिस्टंटद्वारे चित्रपटांचं तिकीट खरेदी किंवा बुक करता येणार आहे.  यासाठी केवळ buy tickets एवढंच किंवा “Hey Google, get me tickets for…” असं बोलावं लागेल. जर तुम्हाला नेमकं काय पाहावं हे समजत नसेल, तर “showtimes near me” असं बोलावं. त्यानंतर तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये सुरू असलेल्या सर्व चित्रपटांबाबत गुगल माहिती देईल. त्यानुसार तुमच्या आवडता सिनेमा तुम्ही पाहू शकतात. जर तुम्हाला त्या सिनेमाविषयी आणखी माहिती हवी असेल तर “who stars in it?” किंवा “show me the trailer” असं बोलावं, त्या सिनेमाबाबत सर्व माहिती गुगल तुमच्यापर्यंत पोहोचवेल. हे फिचर अॅपलच्या सिरीवर उपलब्ध आहे. मात्र, गुगल असिस्टंटद्वारे फंडांगो अॅप डाउनलोड न करताही तुम्ही चित्रपटाचं तिकीट खरेदी करु शकतात.