गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (12:48 IST)

सलमानला मागे टाकत कोहलीने केली 'विराट' कमाई

क्रिकेटच्या मैदानावर दबंग कामगिरी करणार्‍या विराट कोहलीने सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटीच्या यादीत अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. फोर्ब्स इंडियाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींची यादी जारी केली आहे.

2018 मध्ये विराट दुसर्‍या स्थानावर होता. यावेळी त्याने सलमानला मागे टाकले आहे. विराटने या वर्षात 252.72 कोटी इतकी कमाई केली आहे. या क्रमवारीत सलमान 229.25 कोटींसह तिसर्‍या स्थानावर आहे.