शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

विक्रमी केशसंभार

अमेरिकेत फ्लोरिडामध्ये राहत असलेल्या आशा मंडेला या महिलेची तिच्या लांबसडक केसामुंळे जगप्रसिद्धी आहे. या महिलेचे केस 55 फूट लांब आणि वीस किलो वजनाचे आहेत. इतक्या लांब आणि वजनदार केशसंभारामुळे अनेक वेळा तिला त्रास होतो. त्यामुळे अनेक लोकांनी तिला वेळोवेळी हे केस कापण्याचे किंवा थोडे कमी करण्याचे सल्ले दिले होते.
 
मात्र, ही महिला आपण केस कधीच कापणार नाही असे सांगते! आशाला आपले केस धुण्यासाठी एका वेळी सहा बाटल्या शाम्पू वापरावा लागतो. तसेच केस पूर्णपणे वाळण्यासाठी दोन दिवस लागतात. केसांच्या अत्याधिक लांबीमुळे तिला गेल्या 25 वर्षांपासून त्याधून कंगवा फिरवता आलेला नाही. जटा वळाव्यात त्याप्रमाणेच तिचे हे केस आहेत. तिच्या या केसामुंळे तिच्याशी लग्र करण्यासही कुणी तयार नव्हते. मात्र एक दिवस हेअर ड्रेसर इॅन्युएल शेग याची तिच्यावर नजर पडली आणि तो तिच्या प्रेमात पडला. दोघे आता सुखाने संसार करीत आहेत. या केसामुंळे तिच्या पाठीत व मानेत वेदना होतात. डॉक्टरांनी तिला हा केशसंभार कमी करण्याचाही सल्ला दिला होता. मात्र, आपले केस हीच आपली ओळख असून ते मी कधीही कापणार नाही, असेतिने म्हटले आहे. विशेष म्हणजे या केसामुंळेच तिला अनेक जाहिराती मिळतात व त्याधून ती वर्षाला लाखो डॉलर्स कमावते!.