शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (16:03 IST)

काय सांगता,तब्बल 60 तोळ्यांचे सोन्याचे दागिने घालून वधू लग्न मांडवात बसली ,फोटो व्हायरल

चीनमधील एक वधू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वधूने लग्नाच्या दिवशी तब्बल 60 किलो सोन्याचे दागिने घातले. हुबेई प्रांतातील या वधूला तिच्या लग्नाच्या दिवशी पाहून सगळेच स्तब्ध झाले. 30 सप्टेंबर रोजी लग्नात तिने घातलेल्या जड दागिन्यांमुळे वधूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या चित्रात वधू पांढरा लग्नाचा ड्रेस आणि हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ घेताना दिसत आहे
 
दागिन्यांच्या वजनामुळे वधूला हलणे अवघड होत होते आणि ती चालण्यासाठी वराची
मदत घेत होती. मीडिया रिपोर्टनुसार, हे दागिने वधूला तिच्या पतीने हुंडा स्वरूपात दिले होते. वराने तिला प्रत्येकी एक किलो वजनाचे 60 सोन्याचे हार दिले. हार व्यतिरिक्त तिने हातात जड बांगड्याही घातल्या आहेत.
 
वराच्या कुटुंबीयांनी तिला बांगडी भेट म्हणून दिली. असे सांगितले जात आहे की वराचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. बऱ्याचदा लोक सामाजिकरित्या लोकांना दाखवण्यासाठी दागिने घालतात, पण या वधूला पाहून लग्नाला आलेल्या लोकांना तिच्यावर दया येत होती. लग्नातील एका पाहुण्याने वधूला मदत करण्याची इच्छा दर्शवली, ज्याला तिने हसून नकार दिला. ती म्हणाली की ती ठीक आहे आणि लग्नाच्या विधींचे पालन करत राहील.
 
स्थानिक लोक सोन्याला 'सौभाग्याचे' प्रतीक मानतात. येथील लोकांसाठी सोने हे वैभव आणि संपत्तीचे लक्षण आहे. लोक वाईट आत्म्यांपासून आणि दुर्दैवापासून मुक्त होण्यासाठी सोन्याचा वापर करतात. वधूचे बरेच हार आणि बांगड्या घातलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.