सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. ट्रेडिंग
Written By
Last Modified: बुधवार, 10 एप्रिल 2024 (18:36 IST)

साडी नेसल्याने या कॅन्सरचा धोका वाढतो!

red saree look
भारतात साडी हे परिधान अतिशय सामान्य आहे. मात्र आता एक संशोधनातून धक्कादायक बातमी समोर येत आहे की तुम्ही ज्या पद्धतीने साडी घालता त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
 
आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते तुमच्यापैकी अनेकांना आश्चर्यचकित करेल आणि काही तुम्हाला अस्वस्थ करेल. खरं तर, अनेक वैद्यकीय संशोधनातून असे समोर आले आहे की ज्या महिला दररोज साडी नेसतात त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये या प्रकारच्या कॅन्सरवर संशोधन करण्यात आले आहे, ज्यामध्ये साडीसोबत धोतीचाही समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतर या संशोधनानंतर डॉक्टरांनी साडीला कॅन्सर असे नाव दिले.
 
कंबरेला साडी बांधल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का. जर तुम्हाला माहित नसेल तर जाणून घ्या काय आहे या मागील गोष्ट.
 
भारतीय महिला ज्या पद्धतीने साडी नेसतात त्यामुळे त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साडीशिवाय इतर प्रकारच्या कपड्यांमुळेही कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.
 
साडी नेसल्याने स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (Squamous Cell carcinoma ) चा धोका वाढतो. या प्रकारचा कर्करोग भारतीय महिलांमध्ये झपाट्याने पसरत आहे. गेल्या काही वर्षांत साडीच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
 
या हॉस्पिटलमध्ये एक 68 वर्षीय महिलेला कॅन्सर झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून साडी नेसत होती. अशा स्थितीत या कॅन्सरला साडी कॅन्सर असे नाव देण्यात आले आहे. आता कर्करोगाशी साडी नेसण्याचा काय संबंध आहे हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
 
वास्तविक म्हणजे एके ठिकाणी सतत कोणतेही घट्ट कपडे घातल्याने तेथे दबाव निर्माण होतो. कधी-कधी हे कापड त्वचाही सोलते. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास त्वचेवर खुणा दिसू लागतात. जास्त उष्णता, आर्द्रता आणि स्वच्छतेच्या अभावामुळे समस्या वाढू शकतात. या परिस्थितीमुळे कर्करोग होऊ शकतो. वैद्यकीय भाषेत त्वचेच्या या पेशींना कार्सिनोमा म्हणतात. 
 
खरं म्हणजे अनेक महिला नेहमी साडी परिधान करतात आणि साडी बांधत असलेल्या ठिकाणी म्हणेज कंबरेवर खुणा पडतात. कंबरेवर पेटीकोट घातलेल्या कॉटन नाड्यामुळे ही खूण होते. त्यामुळे कंबरेला रगड पडून काळे डाग दिसतात.
 
नंतर हे चिन्ह त्वचेच्या कर्करोगाचे रूप घेते. अति उष्णतेमध्ये राहणाऱ्या महिलांना हा आजार होण्याचा सर्वाधिक धोका असतो. यासोबतच घट्ट जीन्स घातल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो. याशिवाय प्रायव्हेट पार्ट्सचेही नुकसान होते.
 
तथापि या आजाराबद्दल काळजी करण्याची गरज नाही. स्वच्छतेची योग्य काळजी घेतली तर हे टाळता येऊ शकते. याची काळजी घेतल्यास या आजारापासून वाचू शकतो. हा आजार टाळण्यासाठी, तुम्हाला साडी सोडण्याची गरज नाही, फक्त ती परिधान करताना खबरदारी घ्या आणि खूप घट्ट बांधू नका.
 
Disclaimer: येथे देण्यात आलेली बातमी केवल सामान्य माहितीसाठी आहे. या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.