काय झाडी, काय डोंगार,लैच ओके हाय..., सॉंग व्हायरल !
फोटो साभार - सोशल मीडिया सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे . राज्याच्या राजकीय वातावरणात उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या सह शिवसेनेच्या तब्बल ५० आमदारांनी माविआ सरकारच्या विरोधात बंड पुकारला आहे. विधानपरिषद निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले. सध्या एकनाथ शिंदे गट आसामच्या गुवाहाटी येथे आहे. सध्या एकनाथ शिंदेंच्या गटातील एका नेत्याची फोनवरची रिकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील शहाजी पाटील हे फोन वर गुवाहाटीच्या निसर्गाचं आणि हॉटेलचं कौतुक करत आहे. त्यांच्या फोनवरील या रिकॉर्डिंगवरून हिंगोलीच्या एका तरुणाने शहाजी पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर, लईच ओके' या वाक्यावर चक्क गाणं तयार केले आहे.
शंतनू पोळे असे या तरुणाचं नाव असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. शंतनू पोळे या तरुणानं हे गंमतीशीर गाणं बनवलं आहे. सोशल मीडियारील ट्रेंडवर गाणं बनवणाऱ्या यशराज मुखाते यांच्याकडून प्रेरणा घेत हे गाणं बनवल्याचं शंतनू पोळे याने आपल्या इंन्स्टाग्रान पोस्टमध्ये म्हटलं आहे. यशराज मुखाते यांचे 'रसोडे में कौन था ?'हे गाणं प्रचंड व्हायरल झाले. तसेच "या राजकारण्यांच राजकारण तर चालत राहील, आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा, हाय का नाय!" असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.युजर्स ने त्याच्या गाण्याला पसंती दिली आहे. युजर्स त्यावर आपापली प्रतिक्रिया देत आहे.