सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2024 (20:39 IST)

राज्यातील 'हे' उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र!

election commision
निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात, महाराष्ट्रातील एकूण १८ जणांचा समावेश आहे. निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
 
त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. या यादीत नाशिक जिल्हयातील दोघांचा समावेश आहे. त्यात गोविंदा अंबर बोराळे (नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक) आव्हाड महेश झुंजार (नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक) यांचा समावेश आहे.
 
'इलेक्ट्रोल बाँड'चे 'ते' लिफाफे निवडणूक आयोगाकडे; आज नवी माहिती उघड होण्याची शक्यता
देशभरात कोणालाही निवडणुकीच्या नियमांत बसणा-यांना निवडणुका लढवता येणार आहे. पण, राज्यातील १८ अपात्र ठरलेल्या या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. कारण त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने देशभरातील अपात्र ठरलेल्या लोकांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राच्या १८ जणांचा समावेश आहे.
 
हे १८ उमेदवार ठरले  अपात्र
 
गोविंदा अंबर बोराळे (नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक)
आव्हाड महेश झुंजार (नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक)
सुमीत पांडुरंग बारस्कर (चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई)
ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी (चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई)
मोहम्मद इम्रान कुरेशी (चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई)
पांडुरंग टोलाबा वान्ने (लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड)
हबीबुर रहमान खान (भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे)
महेंद्र राजेंद्र बोराडे (बीड विधानसभा मतदारसंघ बीड)
मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल (मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई)
विशाल दत्ता शिंदे (किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड)
इम्रान बशर (नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड)
गायकवाड दिनकर धारोजी (जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी)
अमर शालिकराम पांढरे (आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया)
उमेशकुमार मुलचंद सरोटे (आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया)
दीपक चंद्रभान गाडे (अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे)
नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) (सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे)
मुदसरुद्दीन अलिमुद्दीन (नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड)
 
Edited by Ratnadeep Ranshoor