1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (09:02 IST)

अभय पाटील यांचा सामना प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात

काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीतून महाराष्ट्रातील अकोला मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, काँग्रेसने अकोल्यातून डॉ. अभय काशिनाथ पाटील  यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आज अखेर पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला. दरम्यान, अकोल्यासोबतच काँग्रेसने तेलंगणातील वारंगल मतदारसंघातील उमेदवारदेखील जाहीर केला आहे.

अभय पाटील यांना कोणाचे आव्हान?
अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर लढणार आहे. त्यामुळे आता डॉ. अभय पाटील यांचा सामना या दोन नेत्यांशी असेल.

Edited by -Ratnadeep Ranshoor