बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By

अक्षय कुमार झाला चुंबकाकडे आकर्षित

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे नेहमी चर्चेत राहणार्‍या अक्षय कुमारला सध्या आकर्षित केले आहे एका मराठी चित्रपटाने. अक्षय कुमारने चुंबक पाहिल्यापासून तो त्याच्या बुडाला असल्याचे त्याने स्वत:ने सांगितले.
 
अक्षय इतका प्रभावित झाला आहे की त्याने एक मराठीत बोलत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो सतत माझ्या डोक्यात चुबंक चालत आहे आणि म्हणून मला प्रेक्षकांना हे शेअर करावा असे वाटले म्हणत प्रेक्षकांना हा सिनेमा बघायचा आग्रह केला आहे.
 
प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली आहे. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्याबरोबर केले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट ‘चुंबक’ संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.