गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

केंद्र शासनाच्या योजनांचा पैसा दुष्काळी भागात खर्च करा- शिंदे

WD
दुष्काळी परिस्थितीत अधिकार्‍यांनी अधिक चांगल्याप्रकारे काम करून केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे दुष्काळी भागात जास्तीत जास्त खर्च करावा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यंनी दिल्या.

केंद्रीय गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची सभा आयो‍‍जित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय गृह मंत्र्यांनी सर्व अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

अधिकार्‍यांना सूचना देताना केंद्रीय गृहमंत्री शिंदे म्हणाले, जिल्ह्यात पडलेला दुष्काळ हा सर्व अधिकार्‍यांनी आव्हान म्हणून स्वी कारला पाहिजे. दुष्काळी परिस्थितीत केंद्र व राज्याच्या सर्व योजना दुष्काळी भागातील व्यक्तींपर्यंत प्रयत्नाने पोहोचविल्या पाहिजेत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे राबविण्यात येणार्‍या इंदिरा आवास योजनेंतर्गत देण्यात येणार्‍या घरकुलाच्या जागेबाबत सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जागेबाबत समन्वयाने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. सन 2009-10 आणि 2010-11 या आर्थिक वर्षातील खासदार निधीतून करावयाची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता 'स्पेशल सेल'ची स्थापना करण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचा फेब्रुवारी 2013 पर्यंत झालेल्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. या बैठकीस आमदार गरपतराव देशमुख, दिलीप माने, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त अजय सावरीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक एच. पी. मुळूक उपस्थित होते.