गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. कौल महाराष्ट्राचा
  3. झळा दुष्काळाचा
Written By
Last Updated :नवी दिल्ली , सोमवार, 11 एप्रिल 2016 (16:11 IST)

महाराष्ट्रात गतवर्षी 3228 शेतकर्‍यांची आत्महत्या?

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3228 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. 14 वर्षातील आत्महत्येचा हा सर्वात जास्त आकडा आहे. 2001 पासून आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील हा आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. राज्यसभेत लिखित उत्तर देताना राधामोहनसिंह यांनी ही माहिती दिली आहे.
 
औरंगाबादमध्ये सर्वात जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये 1130, अमरावती 1179, नाशिक 459, नागपूर 362, पुणे 69 आणि कोकणात 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांची आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असल्याची माहितीही राधामोहनसिंह यांनी दिली आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी 1841 कुटुंब मदतीसाठी पात्र आहेत. तर 903 कुटुंब अपात्र असून 484 प्रकरणी चौकशी सुरु आहे.