शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (15:54 IST)

नितीन नांदगावकर यांनी मनसेची साथ सोडली

मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी मनसेची साथ सोडली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विधानसभा निवडणूक लढायची होती तशी इच्छा देखील त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. मात्र, मनसेच्या दोन्ही याद्यांमध्ये नितीन नांदगावकर यांचा समावेश नसल्याने त्यांनी अखेर बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
 
नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. तसेच सोशल मीडियावर नितीन नांदगावकर यांचा एक चाहता वर्ग आहे. त्यांनी फेसबुकचा आधार घेत अनेक विषय हाती घेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. नुकतेच त्यांनी टॅक्सीच्या मीटरमध्ये कशी फेरफार होते याचे प्रात्यक्षिक फेसबुकवर लाईव्ह करत दाखवलं होतं. रिक्षा, टॅक्सी चालकांची मुजोरी, यासारखे अनेक विषय त्यांनी फेसबुकद्वारे लोकांसमोर आणले होते.