बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By

मी खोटारडा महात्मा- असे का म्हटले होते गांधींनी...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आपल्या मृत्यूचा पूर्वाभास झाला होता, याबाबत ते अनेकदा संकेत देऊन चुकले होते.
 
होय, चौधरी चरणसिंह विश्वविद्यालय मेरठच्या इतिहास विभागाच्या माजी अध्यक्ष आणि गांधी अध्ययन संस्थानाच्या माजी निदेशक गीता श्रीवास्तव यांच्या शोधात असे अनेक दृष्टांत दिसून येतात.
 
डॉ. श्रीवास्तव यांच्याप्रमाणे 30 जानेवारी 1948 ला मृत्यू होण्याच्या एका दिवसापूर्वी त्यांनी 'हे राम' उच्चारण करत दुनियेतून विदा होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
 
डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले की शोधात असे अनेक तथ्य समोर मांडण्याचा प्रयत्न केले गेले जे उघडकीस येऊ शकले नाही. त्यांच्याप्रमाणे गांधीजी त्या भाग्यवान महापुरुषांमधून एक होते जे आपल्या इच्छेनुसार मृत्यूला सामोरा गेले. मृत्यूवेळी त्यांच्या जिभेवर 'हे राम' शब्द होते. त्यांचे जवळीक लोकांना माहीत होतं की हीच त्यांची सर्वात मोठी इच्छा होती.
 
एवढेच नव्हे, गांधीजींनी आपल्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी म्हणजे आपल्या अंतिम प्रार्थना सभा दरम्यान काठियावाडहून त्यांना भेटायला आलेल्या दोन नेत्यांना निरोप पाठवला होता की मी जिवंत राहिलो तर सभेनंतर आपल्याशी भेट घेईन. या प्रकारे मृत्यूच्या 24 तासापूर्वी त्यांनी दोन दा अशा पूर्वाभासाची सार्वजनिक रूपात अभिव्यक्ती दिली होती.
 
24 जानेवारी 1948 नंतर ते अनेकदा मनुशी खुनी गोळ्या किंवा गोळ्या झाडण्याबाबत चर्चा केली होती, ज्यात वाईट अंत नव्हे तर जीवन सार्थक झाल्याचा संदेश होता. 
 
आपल्या मृत्यूच्या एका दिवसापूर्वी 29 जानेवारीला त्यांनी मनुला म्हटले होते की माझा मृत्यू कोणत्याही आजारामुळे झाला तर गच्चीवर जाऊन ओरडून-ओरडून दुनियेला सांग की - मी खोटा महात्मा होतो.
 
शेवटी 30 जानेवारी 1948 ला ती दुःखद वेळ आली जेव्हा गांधीजींचा पूर्वाभास खरं होणार होता. आपल्या नाती मनु आणि आभा यांच्या साहाय्याने ते सभेत पोहचले.
 
आता त्यांनी दोन्ही हात जोडून लोकांचे अभिवादन स्वीकार केलेच होते की एक तरुण नाथूराम गोडसे मनुला धक्का देत गांधीजींच्या पुढे अभिवादन करण्याचा अंदाजात वाकला आणि तीन गोळ्या झाडल्या आणि बापू आम्हा सर्वांना सोडून निघून गेले.