सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

श्री मंगलदाणिंकडे सोडला संकल्प आणि झाले उपमुख्यमंत्री

अमळनेरला ही मिळाला मंत्री पदाचा मान
मंगलदाणींच्या आशीर्वादाने मंत्रीपद देखील लाभले 


अमळनेर- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवार दि. १६ जून रोजी मंगळग्रह मंदिराला भेट देऊन श्री मंगळ देवाजवळ मनातील इच्छा आकांक्षा व्यक्त करत संकल्प सोडला होता. त्यांनी व्यक्त केलेली इच्छा कदाचित उपमुख्यमंत्री पदाच्या स्वरूपात पूर्ण झाल्याचे २ जुलै रोजी झालेल्या राजकीय भूकंपात दिसून आले.
 
अमळनेर येथील एका सभेसाठी अजित पवार उपस्थित होते. यानंतर त्यांनी श्री मंगळ ग्रह मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेत संकल्प सोडला होता. यावेळी त्यांच्या समवेत आमदार अनिल भाईदास पाटील हे देखील उपस्थित होते. अमळनेरला आमदार पद तर मिळालेच होते मात्र आता मंगलदाणींच्या आशीर्वादाने मंत्रीपद देखील लाभले असल्याचे बोलले जात आहे. अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर हे अति प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे यामुळे येथे आल्यानंतर भाविकांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत असल्याची प्रचिती अनेकांना येत असते. यामुळेच भाविकांची मोठ्या संख्येने दर्शन व अभिषेकासाठी गर्दी होत असते.