शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (23:39 IST)

आधी दर्शन 'मंगळा'चे नंतर जिल्हा बँक अध्यक्षपदाचा चार्ज घेणार-संजय पवार

अमळनेर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात अतिशय चुरस निर्माण होऊन संजय मुरलीधर पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली. श्री. पवार यांनी या निवडीनंतर सर्वांत अगोदर श्री मंगळग्रह मंदिरात येऊन मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मी निवडणुकीआधीही श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनाला आलो होतो. मात्र, याची वार्ता कुणालाही लागू दिली नव्हती.‌ आता श्री मंगळग्रह देवतेच्या कृपाशीर्वादाने अध्यक्षपदी निवडून आलो. त्यामुळे येथून गेल्यावर आपण पदभार स्वीकारू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की निवडणुकीपूर्वी श्री मंगळग्रह मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतले होते. मनातील इच्छा-आकांक्षा देवाकडे व्यक्त केल्या होत्या आणि आता निवडून आल्यानंतर पुन्हा श्री मंगळग्रह देवतेच्या दर्शनासाठी आलो. मी माळकरी संप्रदायात गेली ३४ वर्षे वारकरी परंपरा जपत आहे. यात फक्त एकच वेळा खंड पडला, तोही जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे हे देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार यांनी  श्री. पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. पवार व उभयतांत  मंगळग्रह सेवा संस्था व जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी काही उपक्रम राबविले जातील का? याबाबत चर्चा झाली.
 
Edited By - Priya Dixit