मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (17:40 IST)

Tulsi Aarti तुळशीची आरती

तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।
अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥
तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।
त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥
 
जय देवी जय देवी जय मये तुळसी ।
अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥
 
मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा ।
पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥
आले यमकिंकर म्हणती रविकुमरा ।
तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय. ॥ २ ॥
 
तुझिया एका दळे सोडविले देव ।
म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥
वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव ।
मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्‌भाव ॥ जय. ॥ ३ ॥