गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2010
Written By वेबदुनिया|

2010 : राशींचे वार्षिक फलादेश

WD
मेष :
हे वर्ष चढउतार दर्शविणारे आहे. पूर्वार्धात संतती विषयी, शैक्षणिक संबंधातील चिंता सतावतील. काही वेळा निर्णय चुक़ण्याचा संभव आहे. जानेवारी 2010 नंतर परिस्थितीत बदल होण्यास सुरवात. एप्रिल 2010 च्या दरम्यान चांगला कालखंड दर्शवितो. विवाह जमणे, संतती लाभ होणे सारख्या घटना मनाला सुखवतील. सुरवातीलाच आर्थिक कोंडी सुटण्यास मदत होईल. गोचीरीची शनी, मंगळ भ्रमणे नोव्हेंबर 2009 पर्यंत फारच कष्टमयव मानसिक त्रासाची जाण्याचा संभव आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना सहकारी वर्ग अथवा अनुभवी लोकांचे मार्गदर्शन वा सल्ला घ्यावा. महिला- फेब्रवारी 2010 पर्यंत मानसिक संतुलन राखावे, खर्चावर नियंत्रण ठेवावे. आहाराची विशेष काळजी घ्यावी. वर्षाअखेरिस शुभ खरेदी होईल. विद्यार्थी- अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. अखेरीस त्रासाचा संभव.

WD
वृषभ :
सुरवातील मानसिक व शारीरिक त्रासदायक कालखंड काहींना जाणवेल. त्या परिस्थितीत कलाकलाने सुधारणा जाणवेल. वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. मानसिक नैराश्य आलेल्यांना नवीन कालखंडांचा आढावा घेऊन मनाचा खणखरपणा निर्माण करावा. डिसेंबर 2009 नंतर व्यवसाय व आर्थिक बाबतीत सुधारणा होणे शक्य. तरूणांचे विवाह अचानक जमतील. मे 2010 नंतरच्या कालखंडात डोळसपणे काम करावे. फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढणे शक्य. महिला- डोकेदुखी, डोळे यांचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. मुतखडा, मूळव्याधीवर वेळीच उपचार घ्या. नवनवीन खरेदी कराल. फेब्रुवारी 2010 मध्ये प्रवास योग. विद्यार्थी- अभ्यासास अनुकुल कालखंड, सहकारी न‍िवडताना, कायदेशीर बाबी हाताळताना काळजी घ्या.

WD
मिथुन :
शनीची भ्रमणे आपल्या राशीतील नवीन पर्वास प्रतिकुल. प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकावे. अवाजवी आत्मविश्वास आत्मघातास कारणीभूत ठरणार नाही, याची काळज‍ी घ्यावी. द्विधा मन:स्थिती व स्वभाव च‍िडचिडा होईल. त्यावर ताबा ठेवा. जानेवारी 2010 नंतर आर्थिक सुधारणा दर्शविते. तरीही येणार्‍या काळात आर्थिक व्यवहार जपूनच करा. जोडीदाराशी वादविवाद टाळा. व्यवसायात व नोकरीत नवीन संधी येतील. काहींना हुलकावणी देण्याची शक्यता आहे. त्यांनी योग्य मार्गदर्शन घ्यावे. संतती संबंधीत शुभवार्ता कळण्यासारखी स्थिती. देवदर्शन अथवा शुभकार्यासाठी प्रवास योग संभोवतो. महिला- यावर्षी मुलांचे विवाह डिसेंबर 2010 नंतर जमणे शक्य. स्नायू दुखी तसेच चर्मविकारावर वेळीच काळजी घ्या. विद्यार्थी- घरातील परिस्थिती अकारण चिंता करणेस भाग पाडेल. सय्यम ठेवून अभ्यासाला लागा. वस्तू गहाळ होणार नाही याची काळजी घ्या.

WD
कर्क :
गेली एकदीड वर्ष जो सर्वचदृष्ट्या त्रासदायक कालखंड जाणवला त्यांना हा येणार काळ आयुष्यातील सुवर्ण पहाट घेऊन येणारा असेल. न झालेली कामे मार्गी लागतील: न्यायालयासंबंधी प्रलंबीत कामकाज पूर्ण होऊन त्यापासून आनंददायी फळे मिळतील. विवाहासाठी अनुकुल काळ. नवीन व्यावसायिंकांना नवे मार्ग सापडतील. बेकारांना नोकरी मिळेल. मे 2010 च्या आसपास मनोरंजन सहलीचे नियोजन कराल. मरगळ निघून जाऊन आनंदी काळ येईल. आळस झटकून कामाला लागा. पैशांची आवक नियमित होऊन त्यात वाढ संभवते. घरात शुभ घटना व कार्य करण्‍यास योग्य काळ. महिला- मानसिक ताणतणावापासून लांब रहा. मनासारख्या घडून समाधान मिळेल. संतती संबंधी अवाजवी चिंता करू नका. नवनवीन वस्तू, दागिने, खरेदी संभवते. विद्यार्थी- फारच चांगला कालखंड येत आहे. अभ्यासातील खडतरता संपून नवीन मार्ग दिसेल. एकुणात आनंदायी कालखंड. नवीन मित्र भेटतील.

WD
सिंह :
साडेसातीची पहिली पाच वर्षे संपलेली असून शेवटची अडीच वर्षे राहिली आहेत. गेली दोन वर्षे रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहार मानसिक ताणतणाव निर्माण करतील. आरोग्याची काळजी घ्या. कोणतेही काम संयम बाळगून व विचार करून करा. फेब्रुवारी 2010 पासून स्थावरपासून प्राप्ती होईल. धार्मिक कार्य कराल. मुलांची चिंता निर्माण करणारा कालखंड. दातासंबंधी व पोटाचे विकार त्रास देण्याचा संभव. रोजच्या जीवनात मतभेद टाळा. थोरामोठ्यांचा उपमर्द करू नका. जानेवारी 2010 पासून विवाह जमण्यास अनुकुल काळ. शारिरीक कष्ट तसेच अचानक मोठी जबाबदारी घेणे सारख्या घटना घडतील. उत्तरार्धात आर्थिक लाभ व उलाढाल समाधान देईल. कोर्टकचेरी सारखे प्रसंग येण्‍याचा संभव. संयम पाळा. महिला- आरोग्याची काळजी घ्या. चुकीचे निदान वाटल्यास दुसर्‍या डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. वाहनसुख मिळेल. विद्यार्थी- स्पर्धेत यश मिळेल. दीर्घकाळ हुलकावणी देणारी मोठी पदवी अथवा पुरस्कार मिळेल. वादविवाद टाळा.

WD
कन्या :
येणारी गुरू व शनिची भ्रमणे द्विधा मन:स्थिती निर्माण करणारी असली तरी संततीच्या बाबतीत समाधानकारक घटना घडतील. व्यवसायात सुधारणा होऊन आजपर्यंत येणार्‍या अडचणी शिथील होतील. शनिचे आपल्या राशीतून होत असलेले भ्रमण गोचीरीच्या योगामुळे मन:स्ताप जाणवणारे वाटेल. योग्य मार्गदर्शनाने त्यावर मात कराल. स्थावर संबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. अकारण गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. फेब्रुवारीनंतर स्वभाव चिडखोर होईल. एकटेपणा जाणवेल. संयम बाळगा. जुनी दुखणी डोके वर काढण्याचा संभव. स्थावर प्रॉपर्टीचे प्रश्न सोडवताना पूर्ण विचार व शांततेने प्रश्न हाताळा. शासकीय कामात डोळसपणे मार्ग काढा. सहकारी व मित्रवर्गाचे सहकार्य मिळेल. उत्तरार्धात आरोग्याच्या तक्रारी योग्य इलाजानंतर कमी होतील. तब्बेत सुधारेल. नातेवाईकांचे संबंध सुधारतील. प्रसंगी लांबचे प्रवास संभवतात. कर्ज फेडीसाठी योग्य संधी येतील. महिला- नवी खरेदी कराल. संतती संबंधी शुभवार्ता कळेल. मुलींचे विवाह जुळतील. प्रेमसंबंधातील फसगत टाळा. विद्यार्थी- अभ्यासासाठी उत्तम कालखंड. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जपून हाताळा. संयम राखा.

WD
तुळ :
हे वर्ष आपणास उत्तरोत्तर प्रगतीचे जाणार आहे. साडेसाती असली तरी, येणारी गुरुची भ्रमणे कलाकार, व्यापारी, कारखानदार यांना उत्तम जाणार. नोकरवर्गाने सुरवातीस सावधपणे मार्गक्रमण करावे. मार्च 2010 नंतर मानसिक व आर्थिक प्रगती होईल. याच काळात इच्छुकांचे विवा. संतती संबधीचे व आर्थिक प्रश्न सुटतील. नातेवाईकांत कार्याचे कौतुक होईल. सुरवातीच्या काळात मतभेद. खरेदीचे व्यवहार करताना सावधानता बाळगा. अवाजवी आत्मविश्वास दर्शविता जाणार नाही. याची काळजी घ्या. शेअर्समध्ये नुकसान संभवते. व्यवहार सावधतेने करा. महिला- वर्षात उंची वस्त्र, अलंकारांचा लाभ. लेखकांना उत्तम काळ. पाठदुखीपासून सांभाळा. विद्यार्थी- सुरवातीचे मंगळ व शनिचे भ्रमण थोडे त्रासदायक. वरिष्ठांशी मतभेद टाळा. उत्तरार्धात चांगली संधी.

WD
वृश्चिक :
हे वर्ष संमिश्र फलदायी आहे. अनेक प्रश्न सतावतील. कोर्ट, कचेरीतील होत आलेली कामांना विलंब. नोकरी, व्यवसायात मानसिक व आर्थिक कटकटी निर्माण होण्याचा काळ. वाहन चालविताना विशेष खबरदारी घ्या. अडथळे व कामात विलंब जाणवत असला तरी मार्च 2010 नंतर अनुकुल स्थिती. सासुरवाडीतील लोकांशी संबंध सुधारतील. राजकारणातील व्यक्तींनी सांभाळावे. छाती व स्नायू दुखीचे त्रास असणार्‍यांना वर्ष थोडे त्रासाचे. योग उपचार करणे. बांधकाम व्यवसायातील लोकांना उत्तरार्ध चांगला. नोकरीत बदल संभवतो. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे, हातून चुका होऊन बदनामीचे प्रसंग येणार नाहीत याची काळजी घ्या. महिला- वादविवाद टाळा. पत्रव्यवहार नवीन पेच निर्माण करतील. त्यामुळे सावधनता बाळगा. कोणावरही‍ चटकन विश्वास ठेवू नका. विद्यार्थी- संयमाने वागा. विश्वासघात, चोरीसारखे आळ येण्यासारखा त्रासदायक काळ. जपावे.

WD
धनु :
धनु राशीच्या व्यक्तींना सुरवातीपासून शुभ घटना साद घालतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. राजकीय व्यक्तींनी थोडे धिराने घ्यावे. उगाच मृगजळाच्या मागे पळू नये. कोर्ट, कचेरीतील कामे मार्गी लागतील. एप्रिल 2010 नंतर तिर्थयात्रा, मंगलकार्यासाठी लांबचे प्रवास शक्य. काहींना अनुग्रह मिळून अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती. विवाह जमतील. हौसमौज, वाहन दुरूस्ती यासारख्या कामांसाठी खर्च. अखेरीस थोडी आर्थिक चिंता संभवते. सुरवातीपासून नियोजन करा. दात, डोळे, डोके यांचा त्रास संभोवतो. जुने विकार असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. वेळेवर उपचार घ्या. महिला- वर्ष उत्तम. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. रक्त विकार, जननेंद्रीयाविषयी त्रास संभवतो. उत्तरार्धात आर्थिक ओढाताण जाणवेल. प्रेमप्रकरणापासून सावधानता बाळगा. विद्यार्थी- अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ. चांगले मार्गदर्शक भेटतील. उच्चशिक्षितांना विशेष लाभ.

WD
मकर :
त्रास संपून नोव्हेंबर 2009 पासून आयुष्यातील नवी पहाट उगविणा. मानसिक व आरोग्य दृष्ट्या उत्तम काळ. कर्जदार व्यक्तींना आर्थिक लाभ होऊन कर्चाची परतफेड होण्यास सुरवात. आजपर्यत होत असलेल्या अवहेलना व फसगत यामुळे त्रस्तता आली. नवीन व्यवसायात संधी. नोकरीत इच्छुकांना अपेक्षित प्रमोशन अथवा बदल होतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी. शेतीतील उत्पन्न मनासारखे. जोडधंदा सुरू करण्‍यासाठी प्रयन्न कराल. स्पर्धा परीक्षेत यश. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी मानसिक स्थिरत्त्व राखावे. उपासना खंडित होते. चिडचिड टाळावी. महिला- जोडीदाराचे प्रेम मिळेल. मनासारखी खरेदी कराल. स्थावरसंबंधीचे व्यवहार होतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो. काळजी घ्या. विद्यार्थी- योग्य मार्गदर्शक मिळेल. समारंभात भाग घ्याल. उत्तम कालखंड.

WD
कुंभ :
वर्ष संमिश्र आहे. श्रावणसरीप्रमाणे चांगला व कष्टदायक काळ यात पाठशियवणी चालेल. आर्थिक फसवणूकीबाबत काळजी घ्या. कोणावर पटकन विश्वास ठेवू नका. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. फेब्रुवारीनंतर विवाहास उत्तम काळ. नोकरदारांनी वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. व्यापारांनी मालमत्तेची नासधुस न होण्याची काळजी घ्यावी. अखेरीस शेती खरेदी व स्थावरासंबंधीचे प्रश्न निकालात निघतील. संतती लाभ अथवा. संततीच्या दृष्टीने कालखंड चांगला. भागिदारीतील व्यवहार जरा जपून करा. गोचीरीची शनि, राहू व मंगळ यांची भ्रमणे सुरवातीस जीव मेटाकुटीला आणतील. आप्तेष्टांच्या दु:खद वार्ता समजतील. मार्च 2010 नंतर शेअर्स मधील व्यक्तींना लाभ दिसतील. मोठे प्रवास दर्शवतील. उत्तरार्धात मनाजोगा फायदा होईल. हे वर्ष सावधपणे राहण्याचे आहे, हे विसरू नका. महिला- रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईक, मित्रपरिवारात अकारण समजगैरसमज निर्माण होतील. त्याची काळजी घ्या. मधुमेही व गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. विद्यार्थी - खडतरपणे अभ्यास करा. सहज साध्य नाही.

WD
मीन :
प्रगती गाडी 2010 नंतर अडखळत जाण्याची शक्यता. सुरवातीपासून सावधानता बाळगा. गुरू बदलानंतर मानसिक संतुलन बिघडणार नाही, याची काळजी घ्या. जास्तीत जास्त कामे अथवा व्यवहार जाने. 2010 पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. संतती, आजार अथवा मानसिक त्रास, नोकरी यांची चिंता निर्माण करणारा कालखंड. वैवाहिक जीवनात घडामोडी. कलह टाळा. कोर्ट कचेरीपासून लांब राहणे इष्ट. संचयीत धन हाताळताना खबरदारी बाळगा. कर्ज काढणे टाळा. नव्या व्यवसायाचा विचार स्थगित ठेवा. एकंदरीत वर्ष कष्टमय व सहजसाध्य लाभ होणारे नाही. योग्य मार्गदर्शन घेऊन उपासना करणे. नैराश्य येवू देऊ नका. गुडघेदुखी, मुत्रविकार असणारांनी वेळेत औषधोपचार घ्यावेत. महिला- मानसिक त्रासाचे वर्ष. मार्च 2010 नंतर आशेचा किरण. गर्भाशय व स्तनदाह यासारखे विकार सतावतील. निद्रानाशाचा त्रास शक्य. योगोपचार करा विद्यार्थी- नवीन शिकायला मिळेल. मोठ्याचा सल्ला केवळ घेऊ नका तर तो माना.