गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (07:38 IST)

केस आणि चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी सोयाबीन, बहुमूल्य फायदे जाणून घेऊया

सोयाबीनमध्ये प्रथिनं असतात म्हणून त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण सोयाबीनचे सेवन निव्वळ आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्य वाढविण्यासाठी देखील फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊया की सोयाबीनच्या सेवन केल्याने कोणते सौंदर्य लाभ मिळतील.
 
1 घनदाट आणि चमकदार केस : जर का आपल्याला घनदाट, काळेभोर चमकदार केस हवे असतील तर सोयाबीनचे सेवन केल्याने मदत. यामध्ये भरपूर प्रथिन असतात. जे आपल्या केसांना घनदाट आणि चमकदार बनवतात.
 
2 चेहऱ्यावरील डाग दूर करा : सोयाबीनचे सेवन करण्यासोबतच चेहऱ्यावर लावणे देखील फायदेशीर ठरेल. यासाठी सोयाबीन पाण्यात काही तासांसाठी भिजवून ठेवा नंतर 
 
ह्याची पेस्ट बनवून घ्या. या पेस्टला चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर पाण्याने चेहऱ्याला धुऊन घ्या.
 
3 बळकट नख : आपल्या नखांचे सौंदर्य आणि चमक सांगतात की आपल्या शरीराला व्यवस्थित पोषण मिळत आहे की नाही. सोयाबीनचे सेवन नखांना बळकट करतं.
 
4 अवकाळी सुरकुत्यांपासून मुक्ती : सोयाबीनचे नियमित सेवनाने शरीरामध्ये एस्ट्रोजन तयार होते, जे डाग आणि सुरकुत्यांना दूर करतं.
 
5 अशक्तपणा दूर करतं : काही लोकं थोडी काम करून लगेच थकतात. त्यांना अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी सोयाबीनचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढविण्यास मदत होते.