बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (09:15 IST)

किशोरवयीन मुलींसाठी त्वचेची काळजी घेण्याच्या काही टिप्स

वाढत्या वयात किंवा तारुण्यात येत असताना बहुतेकदा मुला मुलींना मुरूम आणि या सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. या मागील अनेक कारणे आहे. तणावापासून घेऊन हार्मोन्स मध्ये बदल आणि तेलकट त्वचा असणे देखील कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत चेहरा निस्तेज आणि मुरूम सौंदर्याला खराब करतात. म्हणून आवश्यक आहे की या तारुण्य वयात देखील त्वचेची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या की त्वचेची काळजी कशी घ्यावी.
 
* क्लिंजिंग - 
दिवसाच्या सुरुवातीस चेहरा स्वच्छ करणं आवश्यक आहे. कोणत्याही सौम्य फेसवॉश ने चेहऱ्याला स्वच्छ करा. या वयात त्वचा मऊ असते. चेहऱ्यावरून धूळ आणि घाण स्वच्छ करण्याची गरज आहे. जेणे करून चेहऱ्यावर पुरळ येऊ नये.  
 
* टोनींग -
तरुण वयात त्वचेला या तीन गोष्टीनी काळजी घेण्याची गरज आहे. मग त्वचा तेलकट असो किंवा रुक्ष. पुरळ मुळे चेहऱ्याचे छिद्र मोठे दिसतात असं होऊ नये या साठी सुरुवातीलाच टोनरच्या साहाय्याने त्वचेला हायड्रेट करा. या साठी जास्त अल्कोहोलच्या टोनरच्या ऐवजी नैसर्गिक गुलाबपाण्या सारख्या टोनरचा वापर करावा.
 
* मॉइश्चरायझर -
त्वचेच्या रुक्षपणाला दूर करण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर आवश्यक आहे.  
 
* सनस्क्रीन- 
घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे विसरू नका. हिवाळा असो किंवा उन्हाळा प्रत्येकदा सनस्क्रीन त्वचेला सूर्याच्या यूव्ही किरणां पासून वाचविण्याचे काम करते. सनस्क्रीनचा वापर केल्याने त्वचेवर वयाचा परिणाम देखील त्या लोकांपेक्षा कमी होतो जे सनस्क्रीन चा वापर करत नाही.
 
* घरगुती उपचार -
घरगुती उपचार बरेच असतात परंतु जास्त फायदेशीर आणि भरवशाचे उपचार आहे हरभराडाळीचे पीठ, दही, कच्चं दूध आणि व्हिटॅमिन ई ची गोळी. हे सर्व एका वाटीत मिसळून घ्या हे पॅक चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे तसेच ठेवा नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. महिन्यातून एक किंवा दोन वेळा या पॅक चा वापर केल्याने त्वचा तजेल आणि चमकदार बनेल.