1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : रविवार, 22 मे 2022 (14:34 IST)

उन्हाळ्यात अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

summer tips
हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या वाढत असली तरी हवामानात बदल होताच त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. एवढेच नाही तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या काळात त्वचेची समस्या उद्भवू नये आणि उन्हाळ्यात टॅनिंगच्या इतर समस्या टाळता येतील. एकीकडे उन्हाळ्याच्या हंगामात जिथे जास्त घाम आल्याने त्वचेची चमक कमी होऊ लागते, तर दुसरीकडे सूर्यप्रकाशामुळे त्वचाही काळी पडू लागते. अशा परिस्थितीत, तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत.
 
त्वचेवरील अतिरिक्त केस काढा- सामान्यतः हिवाळ्यात हात आणि पाय कपड्यांनी झाकले जातात परंतु उन्हाळा सुरू होताच आणि शरीराचे हे भाग बाहेर येतात तेव्हा तुम्हाला हात आणि पायांचे केस काढावे लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा उन्हाळा येणार आहे, तेव्हा तुम्ही आधी वॅक्सिंग करून घ्या.
 
सनस्क्रीन वापरा- उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला सनस्क्रीनची जास्त गरज असते. कारण उन्हात त्वचा जळते, त्यामुळे त्वचा निर्जीव दिसू लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्वचेला या ऋतूसाठी तयार करण्यासाठी रोज सनस्क्रीन वापरा.
 
भरपूर पाणी प्या- हिवाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज भासत नाही. परंतू उन्हाळा सुरु झाल्यावर आपल्या सवय बदलावी लागेल. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने चेहर्‍यावर चमक कायम टिकते.
 
त्वचा झाकून बाहेर पडावे- उन्हात बाहेर पडत असाल तर चेहरा-हात-पाय झाकून बाहेर पडावे, याने सर्नबर्न पासून वाचता येतं. तसेच गॉगल लावणे विसरु नये, याने डोळ्याची काळजी तर घेतली जाते तसेच डोळ्याजवळीक त्वचा देखील काळी पडण्यापासून वाचता येतं.