1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

थ्रेडिंग करायला जाताय? तर हे लक्षात ठेवा....

सुंदर दिसण्यासाठी थ्रेडिंग हा प्रकार आवश्यक असून महिन्यातून एकदा तरी यासाठी पार्लरला जावंच लागतं. पण काही जणींना थ्रेडिंग करताना किंवा नंतर त्रास जाणवतो. संवेदनशील त्वचा असल्यास थ्रेडिंगनंतर जळजळ, त्वचा लाल होणे, पुरळ येणं व इतर त्रास उद्भवतात. मात्र काही उपायांनी हा त्रास कमी केला जाऊ शकता:

* थ्रेडिंगपूर्वी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. हलक्या हाताने चेहरा पुसावा. याने वेदनांची तीव्रता कमी होईल.
* थ्रेडिंगपूर्वी चेहर्‍यावर टोनर लावावं. याने ओलावा मिळतो.
 
* थ्रेडिंग नेहमी तज्ज्ञांकडून करवावी. ब्यूटिशियन तज्ज्ञ नसल्यास विपरित परिणाम भोगावे लागू शकतात.
 
* थ्रेडिंग केल्यावर त्वचा लाल होत असेल, जळजळ होत असेल, किंवा पुरळं येत असल्यास लगेच बर्फ लावावा.
* थ्रेडिंगनंतर त्यावर क्रीम किंवा गुलाबजल लावावं. याने रॅशेस येण्याचा धोका कमी होतो.
 
थ्रेडिंगनंतर काही तास कोणत्याही रसायनयुक्त सौंदर्य उत्पादन वापरणे टाळावे.
 
थ्रेडिंगनंतर स्टीम ट्रीटमेंट घेणे टाळा.