शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (12:25 IST)

पिरियडमध्ये रात्रीच्या वेळेस केस धुण्यास का मनाई आहे ?

केसांबद्दल काही अंधश्रद्धा आहे, चला त्याबद्दल माहिती घेऊ.
 
महिला केवळ त्यांच्या चेहऱ्याबद्दल जागरूक नसून त्या त्यांच्या केसांबद्दल देखील फार जगरूक असतात. असे म्हटले जाते की लांब दाट केस स्त्रीचा सौंदर्यात भर घालतात. दुसरीकडे, स्त्रियांच्या केसांशी निगडित बर्‍याच अशा काही गोष्टी आहे, जे ऐकून बर्‍याच लोकांना फक्त अंधश्रद्धा वाटते, आणि बरेच लोक या गोष्टींना सत्य मानतात.
 
बर्‍याचदा आपण घरातील मोठ्या मंडळींकडून ऐकतो की या दिवशी किंवा यावेळी केस खुले ठेवणे अशुभ आहे. परंतु या गोष्टींमध्ये किती सत्य आहे ते आपण जाणून घेऊ. चला बघू या की हे सर्व केवळ अंधश्रद्धा आहे किंवा या मागे काही अन्य कारण ही आहे?
 
* केस विंचरताना हातातून कंगवा सूटने - असं म्हटलं जातं की जर तुम्ही केस विंचरताना तुमच्या हातातून कंगवा पडला तर ते अशुभ असते आणि ते दुर्दैव मानले जाते. दुसरीकडे, डॉक्टरांच्या मते, हे आपल्या दुर्बल शरीरामुळे आहे ज्यामुळे आपल्याला कंगवा धरणे देखील अवघड जाते.
 
* पिरियडमध्ये रात्रीचे केस धुणे - असे मानले जाते की पीरियड्सच्या वेळी, रात्री केस नाही धुवावे. यामुळे रक्तस्त्राव वाढत आणि इतर अनेक गंभीर आजार होतात, या दरम्यान चौथ्या दिवशी केस धुण्यास सांगितले जाते. तथापि, आमच्या डॉक्टर या गोष्टींना होकार देत नाही. त्यांच्या मते पीरियड्स दरम्यान, मुलींना थंडी वाटू नये कारण असे होणे म्हणजे गर्भाशयाला नुकसान होण्याची शक्यता असते.
 
* केसांचे गळणे - असा विश्वास आहे की घरामध्ये गळलेले केस विखुरल्याने आपल्या घरात नेहमी अशांतता राहते. दुसरीकडे ते मनोविज्ञानांशी देखील जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की घर अस्वच्छ  असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर देखील वाईट पडतो. ते मानसिक अडथळा देखील वाढवतात.
 
* गळलेले केस खुल्यामध्ये फेकू नये - असे म्हटले जाते तुटलेल्या केसांना इकडे-तिकडे फेकू नये. कारण याचा वापर जादूटोणासाठी केला जातो. परंतु विशेषज्ञांचा विश्वास आहे की हे देखील स्वच्छतेशी संबंधित आहे आणि अंधविश्वासांमुळे नाही.
 
* सूर्यास्तानंतर केस विंचरणे - असे म्हटले जाते की संध्याकाळी केस मोकळे ठेवल्याने भूत-प्रेत लगेच पकडतात. विशेषतः: लांब केसांच्या स्त्रियांना केस बांधून ठेवायचे निर्देश दिले जातात.
 
* रात्री केस खुले ठेवून झोपणे - असे म्हटले जाते की रात्री केस मोकळे ठेवून झोपल्याने लक्ष्मी क्रोधित होऊन जाते आणि घरात नेहमी गरिबी राहते. दुसरीकडे, असे म्हटले जाते की केस खराब होतात आणि त्यांची चमक निघून जाते. याशिवाय, केसांचे गळणे, कोंडा इत्यादी समस्या देखील उद्भवतात.
 
* केस धुण्यासाठी दिवस सेट करणे - बरेच लोक मानतात की मंगळवार आणि गुरुवारी केस धुणे वाईट असते. असे म्हटले जाते की या दिवशी केस धुण्याने दारिद्र आणि दुर्दैव येतो. पण काही लोक ते मानत नाही. जुन्या वेळेत पाण्याच्या गैरसोयीमुळे लोकांना नदीपासून खूप लांब पाणी घ्यायला जावं लागायचं म्हणून त्यांनी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस केस आणि कपडे धुणे सोडले होते.