1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

देशभर रोमिंग होणार फ्री!

PR
राष्ट्रीय दूरसंचार धोरणाला मंजुरी मिळाल्यामुळे देशभरात मोबइल रोमिंग फ्री होणार आहे. मात्र, ही सेवा केव्हापासून सुरू होईल, याची माहिती मात्र केंद्रीय दळणवळण मंत्री कपिल सिब्बल देऊ शकले नाहीत.

या सेवेमुळे ग्राहकांना काश्मीरपासून कन्याकुमारी किंवा महाराष्ट्रापासून आसामर्मयंत कुठेही गेले तरी, त्यांच्या पॅकेजमध्ये कॉलिंगचे जे दर आहेत त्यानुसारच बिल आकारणी होईल; तसेच इनकमिंग कॉल्सही पूर्णपणे मोफत होतील. याशिवाय, संपूर्ण देशात एकच मोबाईल नंबर वापरता येणार आहे. म्हणजेच शहर किंवा राज्य बदलले तरी, नंबर बदलण्याची गरज भासणार नाही. स्पेक्ट्रम परवान्याचा पुन्हा एकदा लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या धोरणानुसार टेलिकॉम परवाने व स्पेक्ट्रम यांचा संबंध तोडण्यात आला आहे. एनटीपी २0१२ अंतर्गत ऑपरेटरना कोणत्याही तंत्रज्ञानावर आधारित सेवा हवेच्या लहरींचा वापर करून देता येणे शक्य असून, यापुढे र्मयादित फ्रिक्वेन्सी बँड वापरण्यासाठी विशिष्ट सेवा वापरण्याची गरज राहणार नाही. सध्या जीएसएम व सीडीएमएसाठी विशिष्ट फ्रिक्वेन्सी वापरल्या जातात व त्यासाठी परवाना घ्यावा लागतो.