शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2017 (10:58 IST)

आरबीआयकडून लवकरच २० रूपयांची नवीन नोट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच महात्मा गांधी मालिका-२००५ची २० रूपयांची नवीन नोट सादर करणार आहे. आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकाप्रमाणे या नव्या २० रूपयांच्या नोटेच्या नंबर पॅनलवर इनसेट लेटरमध्ये ‘S’ हे आद्याक्षर लिहिलेले असेल. यावर विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.

आरबीआयने म्हटले आहे की, या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनलमधील इनसेट लेटरमध्ये ‘S’ लिहिलेले असेल. त्याचबरोबर या नोटेची रचना बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या नोटेप्रमाणेच असेल, असेही आरबीआयने म्हटले आहे. २० रूपयांच्या सध्या व्यवहारात असलेल्या नोटाही व्यवहारात असतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. जुन्या २० रूपयांच्या नोटांच्या इन्सेट लेटरमध्ये ‘R’ हे आद्याक्षर आहे.