सुब्रतो रॉय यांना दणका, अॅम्बी व्हॅलीवर जप्तीचे आदेश
सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका देत ३९,००० कोटी रुपयांची किंमत असलेल्या अॅम्बी व्हॅलीवर प्रकल्पावर जप्ती आणून पैसे वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
लोणावळा येथील सहारा समूहाच्या महत्त्वाकांक्षी अॅम्बी व्हॅली प्रकल्पावर जप्ती आणण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सहाराने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत वाढवून मागितली होती. ती नाकारण्यात आली आहे. ज्या संपत्तीचा लिलाव करता येईल अशा संपत्तीची यादी द्यावी हा आदेशही न्यायालयाने दिला आहे. २० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाकडे ही यादी सोपविण्यात यावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.