अॅमेझॉनचा फ्रिडम सेल सुरु
अॅमेझॉनच्या फ्रिडम सेलला आजपासून सुरूवात झाली आहे. 9 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू झालेला हा सेल पुढील तीन दिवस म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स आहेत.या तीन दिवसांमध्ये डिस्काऊंट, एक्सचेंज आणि कॅशबॅकच्या माध्यमातून अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. यामधील एक ऑफर म्हणजे तीन हजारांवरच्या खरेदीवर एसबीआयच्या कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. तसंच कमाल 1500 रुपयांचा कॅशबॅकही देण्यात येणार आहे. तर, अॅमेझॉन पे या पेमेंट सिस्टीमचा वापर करुन खरेदी करणाऱ्यांना 5 टक्क्याचा कॅशबॅक मिळेल. विशेष करून मोबाईलवर अनेक आकर्षक ऑफर आहेत.