बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (15:27 IST)

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बँका बंद राहणार आहेत. सहा दिवस बँकेचं कामकाज होणारच नाही. त्यामुळे जर तुमचं बँकेचं कुठलं महत्त्वाचं काम राहिलं असेल तर ते लगेच करुन घ्या नाहीतर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपूर्वी दि. 31 वेगवेगळ्या कारणांसाठी देशातील अनेक बँका बंद राहणार आहेत. यामध्ये प्रमुख कारण म्हणजे 10 बँकांच्या विलिनीकरणा विरोधात 22 ऑक्टोबरला बँक संघटनेने संप पुकारला आहे.
 
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक कर्मचारी परिसंघाच्या या संपाला आता ट्रेड युनिअन काँग्रेस (एटक) ने ही समर्थन आहे. तर 22 ऑक्टोबरला बँका बंद राहातील. बँका विलिनीकरणानंतर 4 नव्या बँक अस्तित्वात येतील. तर आंध्र बँक, इलाहबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या अस्तित्वात राहणार नाही.

तर 22 ऑक्टोबरपूर्वी 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी राहणार आहे. तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल, दिवाळीपूर्वी (27 ऑक्टोबर) तीन दिवस बँका बंद राहातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला दिवाळी आणि रविवार असल्याने बँकेचं कामकाज बंद राहील. दिवाळीनंतर 28 ऑक्टोबरला गोवर्धन पुजा आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद असतील. तसेच, 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँकांचं काम बंद राहणार.