सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 19 जुलै 2017 (12:45 IST)

भारतीय ऑटो बाजारात चीनी कारचे पदार्पण

जगातील मोठ्या वाहन बाजाराच्या दिशेने भारताची होत असलेली वाटचाल अनेक परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय वाढीची संधी देत आहे. याचाच फायदा घेऊन भारतीय बाजारात प्रवेशासाठी चीन उत्सुक असून चीनी एसएआयसी मोटर कार्पोरेशन भारतात त्यांची पावले रोवण्यासाठी सिद्ध झाले आहे. कंपनीचा ब्रिटीश ब्रॅंड एमजी त्यांची कांही मॉडेल्स भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. भारतातील जनरल मोटर्सच्या बंद पडलेल्या हलोल प्रकल्पात या कारचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने केली असल्याचे समजते.
 
एसएमआयसी मोटर कार्पोरेशन त्यांच्या एमजी आठ, एमजी जीएस, एमजी एक्‍सएस व एमजी 6 ही मॉडेल्स भारतीय बाजारात आणणार आहे. पैकी एमजी 8 ही बी प्लस सेगमेंटमधील हचबॅक कार आहे व ती भारतात मारूती बलेनो, हयुंडाई एलिट आय टेन, होंडा जॅझ यांच्याबरोबर स्पर्धा करेल. एमजी जीएस ही एसयूव्ही असून जगभरात ती लोकप्रिय आहे. एमजी एक्‍सएस सध्याच आंतरराष्ट्रीय बाजारात शोकेस केली गेली आहे व ती कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही आहे. ती इको स्पोर्ट, विटारा ब्रेझा, ह्युंडाई क्रेटाशी स्पर्धा करेल.एमजी सिक्‍स ही कंपनीची एकुलती सेदान असून इंटिरियर स्पेस भरपूर असलेली ही कार 0 ते 100 किमीचा वेग 8.4 सेकंदात घेते.