गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (22:08 IST)

रेमडेसिवीर औषध 'सिप्रेमी' ब्रँण्डनेमखाली उपलब्ध होणार

भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी सिप्लाने ‘सिप्रेमी’ हे औषध लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. ‘सिप्रेमी’ हे करोना व्हायरसवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे जेनेरिक व्हर्जन आहे. भारतात रेमडेसिवीर हे औषध सिप्रेमी या ब्रँण्डनेमखाली उपलब्ध होणार आहे.
 
ग्लेनमार्कच्य फॅबीफ्ल्यू आणि हिटेरोज कोविफॉर पाठोपाठ आता सिप्रेमी हे अ‍ॅंटिव्हायरल औषध सुद्धा करोनावरील उपचारासाठी उपब्ध होणार आहे. मागच्या आठवडयात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इर्मजन्सीमध्ये रेमडेसिवीर हे औषध वापरायला परवानगी दिली.
 
भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. अमेरिकेत करोना रुग्णांवर उपचारामध्ये रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरल्याचे दिसले आहे.