महाराष्ट्रासह अनेक राज्यात इंधन तुटवड्याची भीती

petrol
Last Modified सोमवार, 20 जून 2022 (15:03 IST)
वाहनधारकांसाठी अतिशय चिंताजनक वृत्त आहे. कारण महाराष्ट्रासह अनेक राज्यात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे. खाजगी पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा शासनाने कमी केल्याचे सांगितले जात आहे. काही अटी घालत नवीन नियमावली देखील जाहीर केली आहे. यावर खासगी पंप चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पंपामधून फारसा नफा होत नसल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर वाढवून द्यावा, अशी सरकारकडे मागणी पंप चालकांनी केली आहे. त्यातच सध्या अनेक खासगी पेट्रोल पंप बंद दिसत आहेत. त्यामुळे राज्यासह महाराष्ट्रासह अन्य राज्यात कृत्रिम पेट्रोल टंचाई जाणवत आहेत. वास्तविक मे महिन्यापासून देशभरातील काही भागांत इंधन तुटवडा जाणवू लागला. आता जूनमध्ये हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्यामुळे खासगी इंधन कंपन्यांनी पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे १२ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर सुमारे २५ रुपये नुकसान होत असल्याचा दावा केला आहे.
परिणामी, खासगी पेट्रोल पंपचालकांनी आपल्याकडील साठा कमी करण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांत खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. त्याचा भार शासकीय कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर येऊ लागला आहे. इंधन कमतरतेच्या शक्यतेने पेट्रोल पंपावर गर्दीही वाढू लागली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांचा पुरवठाही कमी आहे. त्यामुळे इंधन तुटवड्याची टांगती तलवार आहे.
खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपानी सुरू केलेल्या मनमानी कारभारामुळे सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवरही गर्दी वाढून भार पडू लागला आहे. इंधन पुरवठा सुरुळीत राहावा आणि खासगी इंधन कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसावा यासाठी केंद्र सरकारने देशभरात विशेषत: ग्रामीण भागासाठी सार्वत्रिक सेवा दायित्वाचे (यूएसओ) बंधन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश येणार असून पेट्रोल पंप सुरू किंवा बंद करणे, त्याचा पुरवठा इत्यादींवर सरकारचा वचक राहील.
खासगी कंपन्यांच्या पंप चालकांनाही आपल्याकडे पुरेसा साठा ठेवणे बंधनकारक असेल. तसेच पेट्रोल पंप सुरू करणे आणि बंद करण्याची वेळही सरकार निश्चित करेल. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय इंधन पुरवठा सुरळीत राहील. आवश्यकता भासल्यास नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपचालकांची मान्यताही रद्द केली जाऊ शकते. यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वेही लागू केली जाणार आहेत.
इंधनाच्या किरकोळ विक्री बाजारपेठेवर सुमारे ९० टक्के वर्चस्व आणि नियंत्रण सरकारी क्षेत्रातील तीन प्रमुख कंपन्यांचे आहे. खासगी कंपन्यांच्या पंपचालकांना, किमती एकतर्फी वाढविल्या तर स्पर्धेत टिकाव न धरता ग्राहक गमावण्याचा धोका असल्यामुळे तोटा सोसून खासगी कंपन्यांना व्यवसाय करावा लागत आहे.

काही महिन्यांपासून इंधन दरात वाढ होत आहे. त्यात खासगी पेट्रोल कंपन्यांनी पुरवठा कमी केल्याने पंपावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर ताण येत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पेट्रोप पंप काल शनिवारप्रमाणेच रविवारीही बंद असल्याचे आढळतात.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

लता दीदीच्या जयंती दिनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ...

लता दीदीच्या जयंती दिनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करा
भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय ...

शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून व्हिप

शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून  व्हिप जारी
पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ ...

मोठी कामगिरी : तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मोठी कामगिरी :  तब्बल एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या भरुचमध्ये धडक कारवाई करत, तब्बल एक ...

'तो' संशयित काही तासांत पोलिसांच्या ताब्यात

'तो' संशयित काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबीयांना 3 तासांत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला ...

खरी शिवसेना शिंदे यांचीच असा निकाल येऊ शकतो, आठवले यांचे ...

खरी शिवसेना शिंदे यांचीच असा निकाल येऊ शकतो, आठवले यांचे भाकीत
खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल निवडणूक आयोग देऊ शकतो, असं ...