बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जुलै 2018 (08:54 IST)

सोने-चांदीच्या दरात घसरण

गेल्या चार दिवसात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याला दरात 600 ते 800 रुपयांची घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरातही प्रतिकिलो 620 रुपयांची घट झाली आहे. सराफा बाजारात सुमारे पाच महिन्यांनंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत. सोन्याचा दर प्रति तोळा 30 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा दर प्रतिकिलो 39 हजार 200 रुपयांचा आहे. दरम्यान, याआधी गेल्या फेब्रवारी महिन्यात सोन्याचा भाव 31 हजार रुपयांच्या वर गेला होता. 
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली घसरण आणि स्थानिक सराफांकडून कमी झालेली मागणी यामुळे सोन्या-चांदीचे दर कमी झाल्याचे समजते.